AurangabadCrimeUpdate : विवाहिता प्रियकरा सोबत पुण्यात, नवरोबाला सासुरवाडीच्यांनी धाडले कोमात

औरंगाबाद : काॅलेजला जाते असे सांगून दि .२ नोव्हेंबरला शिवाजीनगरातील विवाहिता अचानक गायब झाली . त्यामुळे तिच्या सासरच्या मंडळींनी तिचे माहेर गाठून तुमची मुलगी माहेरी आली का ? अशी विचारपूस करताच शिवकन्याच्या माहेरच्यांनी जावई राजेश चव्हाण व त्यांच्या इतर नातेवाईकांना बेदम मारहाण केली केली होती. आमची मुलगी कुठे आहे सांगा ? अशी उलट विचारणा करीत , तुम्हीच तिचा खून केला असावा असा आरोप शिवकन्येच्या माहेरच्यांनी करून सासरच्या मंडळींविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
अशा परिस्थितीत पोलिसांसमोर बेपत्ता शिवकन्या हिला शोधण्याचे आव्हान उभे राहिले होते. दरम्यान पोलीस या प्रकरणी तपास करीत असताना निदर्शनास आले कि , दिगंबर कमलनाथ लांडगे (२८ अंदाजे) रा. साठेनगर चिकलठाणा हा तरुणसुद्धा हरवल्याची तक्रार सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. हा तरुण त्याची प्रेयसी शिवकन्या हिला घेऊन पळून गेल्याची माहिती दिगंबर लांडगे च्या घरच्यांनी आणि त्याच्या मित्रांनी पुंडलिकनगर पोलिसांना दिली.
दरम्यान पोलीस तपासात आढळून आले कि , चिकलठाण्यात राहात असलेल्या प्रियकरासोबंत स्वता:चे दागिने मोडून पुण्यात मौज मजा करीत आहे. शिवकन्या (२३) असे या प्रेयसीचे नाव असून याच बेपत्ता शिवकन्येमुळे तिचे वडिल आणि काका पुंडलिकनगर पोलिसांना मुलगी शोधा नाहीतर पोलिस ठाण्यासमोर विष पिऊन जीव देतो अशी धमकी देत आहेत.
दरम्यान शिवकन्या राठोड हिचे लग्न दीड वर्षापूर्वी हतनूर तांडा येथील रहिवासी राजेश चव्हाण सोबंत झाले होते. लग्न झाल्यानंतर दोघांचे वरच्यावर खटके उडंत होते.सोमवारी शिवकन्या काॅलेजला गेल्यावर घरी परतली नाही म्हणून काळजीने तिचे पती राजेश चव्हाण यांनी शोध घेण्यास सुरुवात केली. बेपत्ता असलेली शिवकन्या माहेरी ती आली का ? अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या जावयाला आणि त्याच्या नातेवाइकांनाच तिच्या माहेरच्या लोकांनी बेदम मारहाण करीत तुम्हीच तिचे काही तरी केले म्हणून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला . शिवकन्या आणि तिचा प्रियकर दिगंबर लांडगे यांना आणण्यासाठी वरिष्ठांची परवानगी घेतली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक घन्नशाम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिकनगर पोलिस करंत आहेत.