MaharashtraCoronaUpdate : दिलासादायक : दिवसभरात आढळले ५५०५ रुग्ण तर ८७२८ रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात आज 5505कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8728 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1540005 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 112912 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.68% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 4, 2020
गेल्या २४ तासात राज्यात दिवसभरात ८ हजार ७२८ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १५ लाख ४० हजार ५ इतकी झाली आहे. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा आता ९०.६८ टक्के इतका झाला आहे. दरम्यान आज महाराष्ट्रात ५ हजार ५०५ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मागील २४ तासांमध्ये १२५ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९१ लाख ८५ हजार ८३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ९८ हजार १९८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३ लाख ३५ हजार ६८१ व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत. तर ११ हजार ६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला एकूण १ लाख १२ हजार ९१२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आज राज्यात ५ हजार ५०५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईचा रिकव्हरी रेट ८९ टक्के
मुंबईत मागील २४ तासांमध्ये १ हजार ७१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आजवर मुंबईत २ लाख ३३ हजार २७८ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८९ टक्के झाला आहे. आज घडीला मुंबईत १६ हजार ५२४ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आधीच ९० टक्क्यांचा टप्पा पार करून पुढे गेले आहे.
गेले काही दिवस सातत्याने हे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे खूप मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाची साथ आल्यापासून आतापर्यंत एकूण ९१ लाख ८५ हजार ८३८ करोना चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून त्यात १६ लाख ९८ हजार १९८ चाचण्यांचे ( १८.४९ टक्के ) अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या १३ लाख ३५ हजार ६८१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ११ हजार ६४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात उपचार घेत असलेल्या बाधितांचा आकडा वेगाने कमी होत आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात १६ हजार ६६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर मुंबई पालिका हद्दीत हाच आकडा १६ हजार ५७६ इतका आहे. राज्यात आज १२५ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा एकूण आकडा ४४ हजार ५४८ वर पोहचला आहे. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.६२ टक्के इतका आहे.