WorldNewsUpdate : “या” देशात कोरोना झाला कि मृत्यू अटळच !!! म्हणून कोरोनापासून बचाव करणं इतकंच लोकांच्या हातात आहे !!

जगाच्या पाठीवर उत्तर कोरिया असा देश आहे जो देश आमच्या देशात कोरोना नाहीच अस म्हणतं आहे. मात्र आता इथली कोरोनाबाबतची भयानक बातमी उघड झाली आहे. उत्तर कोरियाचे जग प्रसिद्ध नेते किम जोंग उन आपल्या देशात एकही कोरोना रुग्ण नसल्याचा दावा करतात. मात्र काही रिपोर्टनुसार या देशामध्ये कोरोनाग्रस्तांना जाणूनबुजून कोरोना रुग्णांना मृत्यू दिला जातो आहे. एका वृत्तानुसार उत्तर कोरियामध्ये कोरोना रुग्णांसाठी एक सिक्रेट क्वारंटाईन कॅम्प तयार करण्यात आलं आहे. हेल्पिंग हँडस कोरिया ही संस्था चालवणारे सामाजिक कार्यकर्ते टिम पीटर्स यांनी साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट शी बोलताना यााबाबत माहिती दिली आहे.
या बाबत माहिती देताना , टिम पीटर्स यांनी म्हटले आहे कि , “उत्तर कोरियात कोरोनाची परिस्थिती खूप गंभीर आहे. सिक्रेट आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या लोकांपर्यंत त्यांच्या कुटुंबाला खाणंपिणंही पोहोचवणं शक्य होत नाही. अनेक अडचणी येतात. किम जोंग उन सरकार कोरोना रुग्णांना अगदी कमी जेवण देतं किंवा जेवणच देत नाही. सिक्रेट आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेल्या कित्येक लोकांचा मृत्यूही झाला आहे, असं मला समजलं”
दरम्यान चीनच्या शेजारील देशात कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याचं समोर आलं आहे, यावर विश्वास ठेवणं जगाला कठीण जात आहे. आर्थिक निर्बंध आणि कमकुवत वैद्यकीय व्यवस्थेमुळे उत्तर कोरियाची ४० टक्के जनता कुपोषित आहे आणि या रोगाला ती सहजपणे बळी पडू शकते. अशा परिस्थितीमुळे, उत्तर कोरियामध्ये कोरोना विषाणूच्या साथीमुळे गंभीर संकट उद्भवू शकतं आणि बऱ्याच लोकांचा जीव जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता तर इथल्या कोरोना रुग्णांना खाणंही दिलं जात नाही. त्यामुळे फक्त आजारच नव्हे तर उपासमारीनंही तिथल्या रुग्णांचा मृत्यू होत असल्याची भयाण परिस्थिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत कोरोनापासून स्वतःचा अधिकाधिक बचाव करणं इतकाच या देशातील नागरिकांच्या हातात आहे असे म्हटले जात आहे.