MarathaReservationUpdate : एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलून मराठा समाजाने आपली ताकद दाखवली : शिवेंद्र राजे

मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समितीच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांची गोलमेल परिषद पार पडली. या गोलमेज परिषदेमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. दरम्यान साताऱ्यात हि गोलमेज परिषद असूनही खा. उदयन राजे मात्र अनुपस्थित राहिले. खासदार उदयनराजे भोसले गोलमेल परिषदेला उपस्थित राहणार नाहीत, असा निरोप सुरेश दादा पाटील यांच्याकडून आला होता. मात्र उदयनराजे भोसले अनुपस्थित राहण्यामागचं कारण समजू शकले नाही.
मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या परिषदेत शिवेंद्रराजे भोसले यांनी पानिपतचा दाखला देत मराठा समाजाने एकत्र आले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊनच लढा दिला पाहिजे, असं सांगत एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलली ही मराठ्यांची ताकत आपण दाखवून दिल्याच सांगत आम्हाला आरक्षण देताना इतर समाजाचे आरक्षण काढून आम्हाला आरक्षण नको अशी भूमिका आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली.