MaharashtraElectionUpdate : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकांची तारीख जाहीर

बहुचर्चित औरंगाबाद पुणे, नागपूर, अमरावती, मराठवाडा विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूका जाहीर झाल्या असून एक डिसेंबर रोजी या निवडणुका होत आहेत. भारतीय निवडणूक आयोगाचे प्रफुल अवस्थी अंडर सेक्रेटरी यांनी हे आदेश जारी केले आहेत. दरम्यान नियमांचे पूर्ण पालन या निवडणुकीदरम्यान करण्याचे आदेशही या परिपत्रकात देण्यात आले आहे.
औरंगाबाद विभागातील जिल्हानिहाय मतदार संख्या
निवडणूक आयोगाने यासंदर्भात काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघातील आमदार सतीश चव्हाण , पुणे विभागातील आमदार चंद्रकांत दादा बच्चू पाटील, नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार अनिल सोले , अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार श्रीकांत देशपांडे , पुणे विभागातील शिक्षक मतदार संघाचे आमदार दत्तात्रय सावंत यांची मुदत १९ जुलै २०२० रोजी संपली आहे मात्र दरम्यानच्या काळात कोरोना संसर्गामुळे हि निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडली होती . मात्र आता या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून १ डिसेंबर रोजी हि मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.