MaharashtraCoronaUpdate : दिवसभरात आढळले ४००९ नवे रुग्ण , १०४ कोरोना बाधितांचा मृत्यू

राज्यात आज 4009 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 10225 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 1524304 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 118777 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 90.31% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 2, 2020
गेल्या २४ तासात राज्यात आज ४ हजार ९ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर १० हजार २२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १५ लाख २४ हजार ३०४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात १ लाख १८ हजार ७७७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९०. ३१ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९० लाख ६५ हजार १६८ चाचण्यांपैकी १६ लाख ८७ हजार ७८४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ३३ हजार ७८० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर १२ हजार १९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज दिवसभरात १०४ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णवाढीचा व करोना मृतांचा आकडा झपाट्यानं खाली येताना दिसत आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९०,६५,१६८ चाचण्यांपैकी १६,८७,७८४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर,सध्या राज्यात २५,३३,७८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,१९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.