MaharashtraNewsUpdate : ” त्या ” १२ आमदारांच्या नावाचा लिफाफा तयार , राज्यपालांना केंव्हाही भेटू शकतात मुख्यमंत्री

राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी अखेर तयार झाली असून महाआघाडीतील नेत्यांच्या संमतीने यातील नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे . जेष्ठ मंत्र्यांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यादी घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या यादीत कोण कोण असतील याची जोरदार चर्चा सध्या सुरू असली तरी कोणत्याही पक्षांकडून अधिकृत काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. यावरून अनेक दिवसांपासून चर्चा चालू होती अखेर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चर्चेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत नावांना मान्यता देण्यात आली. यात १२ नावे असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून ही यादी तयार केली आहे. यात अनेक नवीन चेहेरे असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.