MaharashtraNewsUpdate : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी , आठवलेंना त्यांच्याच स्टाईलमध्ये दिल्या बरे होण्यासाठी शुभेच्छा… !!

'कोरोना-गो'चा घेतला ज्याने वसा,
ग्रासले त्याच कविमित्र रामदासा ll
धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका,
कोरोनात नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का ll@RamdasAthawale लवकर बरे व्हा. 🌹— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) October 28, 2020
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खास कोरोनाबाधित झालेल्या रामदास आठवले यांना खास त्यांच्याच स्टाईल लमधून कवितेच्या माध्यमातून त्यांना बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत. रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान आठवले यांनी लवकर करोनावर मात करावी यासाठी अनेकांनी त्यांना सदिच्छा दिल्या आहेत.
मार्च महिन्यात देशात कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर रामदास आठवले यांनी “गो करोना गो..” असा नारा दिल्याने आठवले चांगलेच चर्चेत आले होते. हाच धागा पकडत अनिल देशमुख यांनीही खास कवितेतून आठवलेंना लवकर बरे होण्याच्या सदिच्छा दिल्या आहेत. “करोना- गोचा घेतला ज्याने वसा, ग्रासले त्याच कविमित्र रामदासा; धीर नका सोडू प्रसंग जरी आला बाका, करोना नाही दम इतका जो तुम्हा लावील धक्का. रामदास आठवले लवकर बरे व्हा…” असं अनिल देशमुख यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, रामदास आठवले यांनी अभिनेत्री पायल घोषला रिपाइं पक्षात प्रवेश दिला होता. त्यावेळी रामदास आठवले तिथं उपस्थित होते. तसंच, पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान अनेक कार्यकर्ते व पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होती. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून पक्षाकडून आठवलेंच्या संपर्कात असलेले व लक्षण जाणवत असणाऱ्यांना करोनाची चाचणी करून घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.