MaharashtraCoronaNewsUpdate : राज्याच्या उपचारदरात वाढ , दिवभरात आढळले ६४१७ नवे रुग्ण तर १० हजार रुग्णांना डिस्चार्ज

Maharashtra reports 6,417 COVID-19 cases on Saturday, tally increases to 16,38, 961; death toll up at 43,152 with 137 new fatalities: Health Official
— Press Trust of India (@PTI_News) October 24, 2020
गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ६ हजार ४१७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १३७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा सध्या २.६३ टक्के इतका आहे. दरम्यान महाराष्ट्रात आज १० हजार ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार १०७ करोना रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ८८.७८ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८५ लाख ४८ हजार ३६ रुग्ण नमुन्यांपैकी १६ लाख ३८ हजार ९६१ इतके नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५ लाख ३ हजार ५१० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर १४ हजार १७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात १ लाख ४० हजार १९४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १६ लाख ३८ हजार ९६१ इतकी झाली आहे. मुंबईत आज १२५७ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. मागील २४ तासात ८९८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर मागील २४ तासांमध्ये मुंबईत करोनामुळे ५० मृत्यू झाले आहेत. सध्याच्या घडीला मुंबईत १९ हजार ५५४ अॅक्टिव्ह केसेस आहेत अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.