Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsupdate : अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेच्या शिवबंधनात

Spread the love

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादीच प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आज मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गीता जैन यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केल्याचे जाहीर केले आहे.

जैन या मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार आहेत. गीता जैन यांच्यासोबत मीरा भाईंदर महानगरपालिकेतील काही नगरसेवकही प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढणार आहे. विधानसभा निवडणुकीत गीता जैन यांनी भाजपमधून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. मीरा-भाईंदरसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने शेवटी त्यांनी बंडखोर म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आणि त्या विजयी झाल्या. आता बदलती समिकरण लक्षात घेऊन त्यांनी थेट शिवसेनेतच प्रवेश केला आहे. याचा फायदा शिवसेनेला होणार आहे. माजी महापौर असलेल्या जैन यांचं मीरा भाईंदर मध्ये कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे. विधानसभा निवडणुकीत जैन यांना शिवसेनेने मदतही केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!