MaharashtraCoronaUpdate : राज्यात आढळले 8142 नवे रुग्ण तर 23371 रुग्णांना डिस्चार्ज

https://www.facebook.com/RajeshTopeOfficial/photos/a.529266650511075/3168532949917752/
गेल्या २४ तासात राज्यात ८ हजार १४२ नवीन रुग्णांचे निदान झालं आहे. तर, २३ हजार ३७१ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही आता ८७ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात एकूण १४ लाख १५ हजार ६७९ जण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील मृत्यू दर २. ६४ टक्के इतका झाला आहे. राज्यात आज १८० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यातील विविध रुग्णालयांत सध्या १ लाख ५८ हजार ८५२ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने करोनाचे रुग्ण घटताना दिसत आहेत तसंच, करोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही कमी होताना दिसत आहे. आज पर्यंत तपासण्यात आलेल्या ८३,२७,४९३ चाचण्यांपैकी १६,१७,६५८ चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, सध्या राज्यात २४,४७,२९२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, २३ हजार ३१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.