MaharashtraNewsUpdate : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली हि मागणी

वादळी पावसाने महाराष्ट्राच्या अनेक भागांत प्रचंड नुकसान केलं आहे.अनेक वस्त्यांत पाणी गेलं, शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. @CMOMaharashtra @OfficeofUT यांनी लोकांना दिलासा देण्यासाठी या भागाचा दौरा करावा व आपत्ती व्यवस्थापनासोबत बैठक घेऊन लोकांना काय रिलीफ देणार आहात हे जाहीर करावं. pic.twitter.com/qdWJLUy46J
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) October 17, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः पूरग्रस्त आणि अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांचा दौरा करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला असून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे. तर, प्रकाश आंबेडकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष दौरा करण्याची मागणी केली आहे, तसा व्हिडिओही त्यांनी ट्विट केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे कि , ‘वादळी पावसाने महाराष्ट्राच्या अनेक भागांत प्रचंड नुकसान केलं आहे. अनेक वस्त्यांमध्ये पाणी गेलं आहे. शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकांना दिलासा देण्यासाठी या भागाचा दौरा करावा व आपत्ती व्यवस्थापनासोबक बैठक घेऊन लोकांना काय मदत देणार हे जाहीर करावं’. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद उद्या आणि पर्वा दोन दिवस मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचे वृत्त आहे.