अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार , मावशी , मामा आणि काकाला १० वर्षाची सक्तमजुरी , शिक्षिकेमुळे दाखल झाला होता गुन्हा

औरंगाबाद – अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात पोक्सो अंतर्गत अटक असलेल्या चार आरोपींना विशेष न्यायालयाने १०वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली . यामधे सुधीर सुरडकर, ठकू सुरडकर, संतोष जुमडे, यांचा आरोपी म्हणून समावेश आहे. २०१९ मधे इयत्ता सहावीत शिक्षण घेणारी मुलगी आई वडिल हयात नसल्यामुळे मावशीकडे राहात होती. त्यावेळी मावशीचा नवरा व मुलीच्या मामाने तिच्याशी गैरवर्तन केले. हा प्रकार पिडीतेने तिच्या शिक्षीकेला सांगितला. शिक्षीकेच्या फिर्यादीवरुन या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करुन आरोपींना अटक केली होती.