IndiaNewsUpdate : मुलीच्या लग्नाचे वय नेमकं किती , लवकरच जाहीर करण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन

Discussion is underway to decide the right age for marriage of our daughters. From across the country, daughters write to me asking why hasn't the concerned committee given its decision yet. I assure all daughters that as soon as the report comes, govt will act on it: PM Modi pic.twitter.com/5qna5V3lZQ
— ANI (@ANI) October 16, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींच्या लग्नाचं योग्य वय किती असावं यासंबंधी सरकार लवकरच निर्णय घेईल असं आश्वासन दिलं आहे. याबाबत समिती गठीत केली असून संबंधित समितीने अहवाल दिल्यानंतर लगेचच यासंबंधी निर्णय घेण्यात येईल असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एका कार्यक्रमानिमित्त बोलताना त्यांनी ही माहिती दिली. महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहितीही मोदी यांनी यावेळी दिली. “प्रत्येक मुलीच्या हिताची आपण काळजी घेत आहोत. जल जीवन मोहिमेअंतर्गत प्रत्येक घराला पाणी पोहोचवण्याचं काम सुरु आहे. १ रुपयात सॅनिटरी पॅड उपलब्ध केलं जात आहे. मुलींच्या लग्नाचं योग्य वय किती असावं यासंबंधी चर्चा सुरु आहे. संपूर्ण देशभरातील मुलींनी, मला अद्यापही संबंधित समितीने अहवाल सादर केला नसल्याबद्दल विचारणा केली आहे. मी त्या सर्वांना आश्वस्त करतो की अहवाल आल्यानंतर लगेचच सरकार त्यावर काम सुरु करेल. लग्न आणि आई होण्याचं वय यामधील नेमका संबंध जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून २२ सप्टेंबर रोजी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे.