CoronaMaharashtraUpdate : GoodNews : कोरोनमुक्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

आज दिवसभरात 10 हजार 552 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 158 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 19 हजार 517 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण 13 लाख 16 हजार 769 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 84.71 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 158 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे. राज्यात तपासण्यात आलेल्या 78,38,318 चाचण्यांपैकी 15,54, 389 म्हणजे 19.83 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 96 हजार 288 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांच्या मृत्यूच्या संखेत होणारी घटही कायम आहे. मात्र गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत बुधवारी नव्या रुग्णांची संख्या थोडी वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा आकडा 10 हजारांच्या खाली होता.