Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : TRPScam : रिपब्लिक टीव्हीचे कर्मचारी गुन्हे शाखेच्या जाळ्यात , प्राथमिक तपासात उघड होताहेत अनेक भानगडी

Spread the love

बहुचर्चित टीआरपी घोटाळा प्रकरणात आज दिवसभर मुंबई गुन्हे शाखेने रिपब्लिक टीव्ही चॅनलचे विकास खानचंदानी, हर्ष भंडारी यांची मुंबईत तर दमणमध्ये डिस्ट्रिब्यूशन हेड घनश्याम सिंग यांची चौकशी केली. या तिघांनाही उद्या चौकशीसाठी कागदपत्रांसह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या वतीने रिपब्लिक टीव्हीच्या या कर्मचाऱ्यांना सीआरपीसी ९१ अन्वये नोटीस बजावली असून चॅनलला मिळालेल्या जाहिराती, त्यातून मिळालेले उत्पन्न आणि इतर महत्त्वाची कागदपत्र घेऊन चौकशीला हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान या प्रकरणात रविवारी पोलिसांनी रिपब्लिक टीव्ही चॅनलचे विकास खानचंदानी यांची ९ तास, हर्ष भंडारी यांची ६ तास, तर मुंबईत आणि दमण पोलिसांनी डिस्ट्रिब्यूशन हेड घनश्याम सिंग याची ६ तास कसून चौकशी केली असून या तिघांनाही टीव्ही जाहिराती संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर पोलिसांकडे जमा करण्यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. जाहिरातीतून मिळणारे उत्पन्न, नफा, तोटा यांसंदर्भातला सगळा डाटा रिपब्लिकला पोलिसांना तपासासाठी द्यावा लागणार आहे.
दरम्यान आजच्या चौकशीत टीव्हीवर दिसणाऱ्या कंटेंटशी आमचे देणंघेणं नसून त्यासाठी एडिटोरियल विभाग जबाबदार असतो, अशी माहिती विकास खानचंदानी यांनी दिली आहे. काल रिपब्लिक चॅनेलवर एक शो ऑन एअर करण्यात आला. ज्यामध्ये हंसा नावाच्या कंपनीचा अहवाल आहे. असं सांगून त्या शोमध्ये इंडिया टुडेवर आरोप करण्यात आले आहेत. मात्र हंसा कंपनीने तो अहवाल स्वतःचा नसल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या संदर्भात रिपब्लिक टीव्हीची वेगळी चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. या शो संदर्भात उत्तर देण्यास विकास खानचंदानी यांनी मात्र असमर्थता दर्शवली आहे. याशिवाय काल सीएफओ एस सुंदरम आणि डिस्ट्रिब्युटर हेड यांना समन्स बजवण्यात आल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांना पत्र पाठवले होतं. ज्यामध्ये सुप्रीम कोर्टातली सुनावणी होईपर्यंत आमची चौकशी थांबवावी असं म्हटलं होतं. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एक समन्स जारी केलं त्यावर आईच्या कोविड आजाराचे कारण सुंदरम यांनी पोलिसांना सांगितलं आहे. १४ ऑक्टोबरनंतर चौकशीला आपण हजर राहू असं एस सुब्रमण्यम (सीएफओ) यांनी स्पष्ट केले आहे. तर प्रिया मुखर्जीने आपण बंगलोरमध्ये असल्याने येऊ शकत नसल्याचे आज सकाळी पोलिसांना कळवले. शिवाय सुप्रीम कोर्टातली सुनावणी होईपर्यंत चौकशीला येणार नसल्याचे मुखर्जीचे पोलिसांना उत्तर दिले आहे.
या प्रकरणातल्या आरोपींच्या शोधासाठी रविवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांचे एक पथक राजस्थानला रवाना झाले आहे. दरम्यान विशाल भंडारी याच्या घरातून आज गुन्हे शाखेने एक डायरी हस्तगत केली आहे. ज्यामध्ये बॅरोमिटर आणि चॅनेल्सची नाव आणि ट्रान्जेक्शनच्या नोंदी आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आलेल्या तीन चॅनेल्सपेक्षा जास्त चॅनल्सची नाव आहे. त्यानुसार लोकांना पैसे द्यायचे आहेत, अशी नोंद आरोपी विशालने त्याच्या डायरीमध्ये नोंद करून ठेवली आहे. विशालने त्याच्या डायरीमध्ये १८०० घरांचे डिटेल्स ठेवले आहेत. ज्यामध्ये बॅरोमीटर्स बसवण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार रिपब्लिक, फक्त मराठी आणि बॉक्स ऑफिस चॅनेल्सच्या व्यतिरिक्त आणखी काही चॅनेल्स संशयाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता आहे. याच बरोबर रिपब्लिककडून एका बँक खात्याची माहिती मिळाली असून पोलीस अधिक तपस करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!