HathrasGangRapeCase : हाथरस पीडितेच्या कुटुंबियांना भेटून प्रकाश आंबेडकरांनी दिला ” हा ” विश्वास

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी हाथरस येथे जाऊन पीडित परिवाराची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि , पीडितेच्या परिवाराला भेटण्यासाठी मी आलो होतो. योगी सरकारने त्यांना लखनौला घेऊन जाण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्यांच्या या घोषणेनंतर कोणीही त्यांना नेण्यासाठी आले नाही. या सर्व प्रकरणात सरकारला अधिक संवेदनशिळोण्याची गरज आहे. आम्ही आणि देशातील कोट्यवधी आंबेडकरवादी या परिवाराच्या सोबत आहेत असा विश्वास देऊन मी जात आहे.
या प्रकरणात एसआयटी आणि आता सीबीआयकडे तपस दिला आहे यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि , पीडित परिवाराचा पोलीस आणि सीबीआयवर विश्वास राहिलेला नाही. शासन – प्रशासनाने आपली विश्वसार्हता पूर्णतः गमावली आहे. त्यामुळे पीडितेच्या परिवाराने या प्रकरणाची सेवानिवृत्त किंवा सध्या न्यायासनावर असलेल्या न्यायाधिशाकडून चौकशी करण्यात यावी आणि मला वाटते कि , त्यांची मागणी योग्य आहे. त्यांच्या या मागणीनुसारच इतर पक्ष संघटनांनीही मागणी करावी लागेल.