Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कोरोना लसीच्या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली हि माहिती

Spread the love

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनावरील लसीच्या प्रगतीसंदर्भात माहिती देताना म्हटले आहे कि , सरकारकडून जुलै २०२१ पर्यंत देशातील २५ कोटी जनतेला कोरोनाची लस दिली जाऊ शकते. आज संडे संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. हर्षवर्धन पुढे म्हणाले की,  सरकारला कोरोना लसीचे ४०० ते ५०० कोटी डोस प्राप्त होतील आणि यातील जुलैपर्यंत २५ कोटी लोकांना लसीकरण पूर्ण होईल असं अनुमान आहे. सरकार कोरोना आजारावर नियंत्रणासाठी २४  तास काम करत आहे. तसेच कोरोनाची लस आल्यानंतर त्याच्या वितरण प्रणालीसाठी देखील काम सुरु आहे. ते म्हणाले की, आमची प्राथमिकता आहे की देशातील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस कशी दिली जाईल. कोरोना लसीच्या संदर्भात एक उच्चस्तरीय तज्ञांनी कमिटी देखील कार्यरत आहे, असं त्यांनी सांगितलं.

कोरोनावर प्रभावी लस शोधण्यासाठी  जगभरात प्रयत्न सुरु आहेत. भारतात देखील लसीवर काम सुरु आहे. देशात सध्या कोरोनावर तीन कंपन्यांकडून लसीचं काम सुरु आहे. यात  भारत बायोटेक-आयसीएमआरची कोवॅक्सिन, जायडस कॅडिला जायकोव-डी आणि ऑक्सफोर्डची कोरोना वॅक्सिन यांचा समावेश आहे. सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ऑक्‍सफर्ड यूनिव्हर्सिटीनं बनवलेल्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरु आहे. बाकीच्या दोन लसीची वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत. सीरम इन्सिट्यूटची कोरोनावर लस जानेवारी शेवटपर्यंत येईल, अशी माहिती सीरमनं शरद पवार यांना दिली दिली आहे. त्यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सांगितलं की, सीरम इन्स्टिट्युटमध्ये जाऊन प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे इंजेक्शन घेतले. माझ्यासोबत माझ्या स्टाफने देखील घेतले. मात्र हे कोरोनाचे औषधं नाही. सीरमची लस तयार व्हायला जानेवारीचा शेवट येईल असं मला त्यांनी सांगितलंय, असं शरद पवार म्हणाले होते.

दरम्यान भारतात कोरोनाचा संसर्ग  वेगाने होत चालला असून देशात कोरोनाबाधितांची संख्या ६५ लाखांच्या वर गेली आहे. काल दिवसभरात देशात नवीन ७५ हजारांहून अधिक केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. दिलासादायक गोष्ट अशी की देशभरात मागील २४ तासात ८२ हजार २६० जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर  ९४० जणांचा मृत्यू कोरोनामुळे  झाला आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनामुळे  मृत पावलेल्यांची संख्या १ लाख एक हजार ७८२ एवढी झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!