MaharashtraNewsUpdate : गेल्या २४ तासात २१५ पोलिसांना कोरोनाची बाधा , ३ हजार १०७ पोलिसांवर चालू आहेत उपचार

215 police personnel tested positive for #COVID19 in the last 24 hours, taking total cases to 23,033 in the force including 19,681 recoveries, 3,107 active cases and 245 deaths: Maharashtra Police pic.twitter.com/c6RwV7qaO2
— ANI (@ANI) September 29, 2020
गेल्या २४ तासांमध्ये आणखी २१५ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. याचबरोबर राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या आता २३ हजार ३३ वर पोहचली असून सध्या ३ हजार १०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १९ हजार ६८१ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. आतापर्यंत मृत्यू २४५ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे. राज्यातील एकूण २३ हजार ३३ करोनाबाधित पोलिसांमध्ये २ हजार ५२१ अधिकारी व २० हजार ५१२ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)३ हजार १०७ पोलिसांमध्ये ३८८ अधिकारी व २ हजार ७१९ कर्मचारी आहेत. करोनातून बरे झालेल्या झालेल्या १९ हजार ६८१ पोलिसांमध्ये अधिकारी २ हजार १०८ व १७ हजार ५७३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या २४५ पोलिसांमध्ये २५ अधिकारी व २२० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.