CoronaMaharshtraUpdate : वर्षा गायकवाड नंतर उदय सामंत आणि मुख्य सचिव संजयकुमार यांनाही कोरोनाची लागण

गेले दहा दिवस स्वतः विलगिकरनात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली.रिपोर्ट+ve आला आहे.मी गेले10दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे.. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार.
— Uday Samant (@samant_uday) September 29, 2020
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांना कोरोना झाल्यानंतर त्या बऱ्या होत नाहीत तोच आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना तसेच राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनाही करोनाची लागण झाली आहे. उदय सामंत यांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘गेले दहा दिवस स्वतः विलगिकरणात आहे. नुकतीच कोविड टेस्ट करून घेतली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेले दहा दिवसांत कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे. पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होईन, असं सामंत यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख. सुनील केदार, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, अब्दुल सत्तार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे या मंत्र्यांचा समावेश आहे. या सर्वांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.
दरम्यान आता राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून सध्या ते घरीच क्वारंटाईन आहेत.मुख्य सचिव हे अनेक बैठकांना हजर असल्याने प्रशासनाची सध्या चिंता वाढली आहे. मागील आठवड्यात मंगळवारी २२ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला ते हजर होते. यापूर्वी अनेक प्रधान सचिव आणि सचिव दर्जाच्या अधिकार्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या पार्श्वभुमीवर मंत्रालयात आता विशेष काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना सौम्य लक्षण जाणवत असल्याने संजय कुमार यांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली होती. सौम्य लक्षणे जाणवू लागल्यापासून ते स्वतः विलगीकरणात गेले होते. आज त्यांचा कोरोना अहवाल आला.
आहे.