AurangabadCrimeUpdate : सेक्स रॅकेटचा अड्डा उध्दवस्थ, एकास अटक, चार तरुणी घेतल्या ताब्यात , नाशिकच्या आणखी तिघांचा आरोपीत समावेश

स्पाच्या नावाने सुरु होता गोरखधंदा
नागालँड मधील दोन व शहरातील दोन चौघीं पिडीत, एक अटक
१९ हजारांची रोकड, दहा मोबाईल जप्त
औरंगाबाद – स्पॉच्या नावाने सेक्स रॅकेट चालवणा-या सिडको एन-४ भातील एलोरा स्पॉ सेंटरवर पुंडलीकनगर पोलीसांनी छापा मारून दोन नागालँड मधील तसेच शहरातील दोन तरूणी पिडीता आहेत. त्यांच्या ताब्यातून १९ हजारांची रोख रक्कम, दहा मोबाइल आणि मसाज मशिनरी जप्त करण्यात आली होती. विशेष म्हणजे दोन दिवसापुर्वी एका तरूणीने स्पाच्या नावाने सिडको आणि कोकणवाडी भागात सेक्स रॅकेट सुरु असल्याची तक्रार दिली होती.
शहरातील सिडको आणि कोकणवाडी भागात स्पाच्या नावाने सेक्स रॅकेट सुरु असल्याचे उघडकीस आले होते. स्पा मालक येणा-या ग्राहकांसोबत बाहेर जाण्यास आणि त्यांच्यासोबत अशलील चाळे करण्यास भाग पाडतात. तसे न केल्यास पगार थांबवुन जिवे मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार एका पिडीतेने पोलीस आयुक्तांकडे दिली होती. हि घटना ताजी असतानाच पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने सिडको एन-४ भागाातील सेक्स रॅकेटचा अड्डा उध्दवस्थ केला.
सिडको एन-४ भागातील गोकुळ स्विटस समोरील एलोरा स्पॉ मध्ये नागालँड मधील तरूणी मार्फत वेश्यव्यवसाय सुरु होता एका रात्रीचे दोन ते पाच हजारापर्यंत दर असल्याची असल्याची माहिती घनश्याम सोनवणे यांना मिळाली होती. पंटरला पाठवुन त्यांनी शहनिशा केली असता स्पा मध्ये वेश्यव्यवसाय सुरु असल्याची खात्री झाली. यावरून त्यांनी पथकासह आज दुपारी अडिचच्या सुमारास स्पा सेंटरवर छापा मारून दोन नागलँड मधील तरूणीसह दोन महिलांना ताब्यात घेतले. मयूर पार्कमधील आकाश पगडे, याला अटक केली. या प्रकरणी पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.