CoronaMaharshtraUpdate : एक नजर : गेल्या २४ तासात आढळले १७, ७९४ नवे रुग्ण , ४१६ रुग्णांचा मृत्यू , १९,५९२ रुग्णांना डिस्चार्ज

Maharashtra reports 17,794 new #COVID19 cases, 19,592 recoveries & 416 deaths in the last 24 hours, taking total positive cases to 13,00,757 till date, including 2,72,775 active cases, 9,92,806 discharges & 34,761 deaths: State Health Department pic.twitter.com/aB50XeCFNx
— ANI (@ANI) September 25, 2020
आज राज्यात १७ हजार ७९४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये करोनाची बाधा होऊन ४१६ मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र्रातील एकूण रुग्णसंख्येने १३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या १३ लाख ७५७ इतकी झाली आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १९ हजार ५९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवर महाराष्ट्रात ९ लाख ९२ हजार ८०६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७६.३३ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
राज्यात गुरूवारी दिवसभरात कोरोनानं 459 जणांचा बळी घेतला होता. तर 19 हजार 164 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 17 हजार 184 रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. आजवर तपासण्यात आलेल्या ६२ लाख ८० हजार ७८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३ लाख ७५७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९ लाख २९ हजार ५७२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३२ हजार ७४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला २ लाख ७२ हजार ७७५ अॅक्टिव्ह केसेस आहेत.
आज राज्यात १७ हजार ७९४ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील बाधित रुग्णांची एकूण संख्या १३ लाख ७५७ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ४१६ मृत्यूंची नोंद झाली आहे. ज्यापैकी २२८ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १०६ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ८२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालवाधीपूर्वीचे आहेत. अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.