IndiaNewsUpdate : कृषी विधेयकावरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलक आक्रमक

पंजाब: कांग्रेस नेता नवजोत सिंह सिद्धू संसद में कृषि सुधार बिलों को पारित करने के खिलाफ किसानों के विरोध के समर्थन में विरोध प्रदर्शन करते हुए। pic.twitter.com/Ax7hofYl6Z
— ANI_HindiNews (@AHindinews) September 23, 2020
केंद्र सरकारने संसदेच्या दोन्हीही सभागृहात पास केलेल्या कृषी विषयक विधेयकांवरून उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये शेतकरी आंदोलन करत रस्त्यावर उतरले आहेत. याच दरम्यान, हरियाणाच्या पानीपतमध्ये दिल्लीकडे निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना अडवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आला. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी चक्क अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडल्या तसेच आंदोलक शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा केला. यासोबतच काही शेतकऱ्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे. कृषी विषयक विधेयके शेतकऱ्यांसाठी ‘डेथ वॉरंट’ असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांकडून व्यक्त करण्यात येत असून कोणत्याही किंमतीत ही विधेयके लागू होऊ देणार नाही, अशी भूमिकाच या शेतकऱ्यांनी घेतली असून काँग्रेसनेते नवज्योत सिंग सिद्धू या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत.
दरम्यान, या विधेयकांच्या निषेधार्थ भारतीय शेतकरी युनियन आणि अखिल भारतीय शेतकरी संघर्षष समन्वय समितीनं २५ सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. आम्हाला जे मिळतंय, त्यात आम्ही समाधानी आहोत. सरकारनं आम्हाला आणखी काहीही देण्याचा प्रयत्न करू नये, असा सूचना वजा इशाराच या शेतकऱ्यांनी आंदोलनाद्वारे सत्ताधाऱ्यांना दिला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांच्या जमिनी अदानी – अंबानींना विकण्याचा प्रयत्न केला जातोय. सरकार लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. या विधेयकांमुळे शेतकरी देशोधडीला लागेल, असा आरोपही या शेतकऱ्यांनी केला आहे.
#WATCH: MPs of Opposition parties march in Parliament premises in protest over farm bills. Placards of 'Save Farmers' & 'Save Farmers, Save Workers, Save Democracy' seen.
Congress' Ghulam Nabi Azad, TMC's Derek O'Brien, and Samajwadi Party's Jaya Bachchan present, among others. pic.twitter.com/PIIxqciFpG
— ANI (@ANI) September 23, 2020
दरम्यान राज्यसभेतही कृषी विषयक विधेयकांचा विरोध करत विरोधी पक्षाच्या खासदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे . या मुद्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. आज सायंकाळी ५.०० वाजता ही भेट होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या शिष्टमंडळात केवळ पाच नेत्यांना राष्ट्रपतींना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.