MumbaiNewsUpdate : दिशा सालियनच्या मृत्यूपूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रत्यक्षदर्शीचा दावा

दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी तिचा मृत्यू होण्यापूर्वी पार्टीमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा खुलासा प्रत्यक्षदर्शीने ‘न्यूज नेशन’ या वृत्तवाहिनीकडे केला. त्या पार्टीमध्ये बॉलिवूडमधला एक स्टारसुद्धा उपस्थित होता, असंही त्याने सांगितलं. “पार्टीमध्ये एकूण सहा जण उपस्थित होते. दिशाचा होणारा पती रोहन रॉयसुद्धा उपस्थित होता. चार जणांनी मिळून दिशावर बलात्कार केला. दिशाचा आवाज बाहेर ऐकू जाऊ नये म्हणून मोठ्या आवाजात गाणी लावली होती,” अशी धक्कादायक माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. दिशाचा ८ जून रोजी मुंबईतील एका इमारतीतील चौदाव्या मजल्यावरून पडल्यामुळे मृत्यू झाला. गेल्या महिन्यात दिशाच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई पोलिसांनी मृत्यूची चौकशी सुरू केली. दिशाबाबत अफवा पसरवल्या प्रकरणी त्यांनी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दिशाच्या मृत्यूनंतर एका आठवड्यानंतर १४ जून रोजी सुशांतचा मुंबईतील त्याच्या राहत्या घरी मृतदेह आढळला.