Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ऐकावे ते नवलच !! दारुड्या बायकोपासून संरक्षण द्या , पीडित पतीची पोलिसात धाव….

Spread the love

बायको दारू पिऊन मारहाण करते, अशी तक्रार करत एका तरुणाने पोलिसांकडे सुरक्षा पुरवण्याची मागणी केली आहे. अहमदाबादजवळील मणिनगर येथे घडला असून  खोकरा पोलीस स्टेशनमध्ये एका विवाहित पुरुषाने गुरुवारी पत्नी मारहाण करत असल्याची तक्रार दाखल केली आहे. पतीची ही तक्रार ऐकून पोलिसही आश्चर्यचकीत झाले. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

या वृत्तात म्हटले आहे कि , २९ वर्षीय व्यक्तीचा  २५ वर्षीय मुलीसोबत मार्च २०१८ मध्ये प्रेमविवाह झाला होता. त्यावेळी पत्नीच्या दारुच्या व्यसनाबद्दल पतीला कोणतीही कल्पना नव्हती. पण लग्नानंतर पत्नी सतत दारु पिऊन घरांमध्ये गोंधळ घालू लागली. पत्नीचे दारुचे व्यसन सुटावे म्हणून पतीने अनेक प्रयत्न केले. मात्र, याला पत्नीची साथ नव्हती. दिवसेंदिवस पत्नीचं दारुचं व्यसन वाढतच गेलं. दारु पिल्यानंतर ती सासू सासऱ्यालाही मारहाण अन् शिव्यागाळ करु लागली. त्यामुळे त्यानं आई-वडिलांपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. मात्र तरिही स्नेहाची सवय सुटली नाही. दरम्यान त्याच्या आई -वडिलांना जूनमध्ये करोनाची लागण झाली. त्यानंतर तो पुन्हा त्यांच्याकडे येऊन राहू लागला. त्यानंतर पत्नीही त्याच्यापाठोपाठ तिथे आली व घराच्या वरच्या माळ्यावर राहू लागली. त्यानंतर पुन्हा तिने दारू पिऊन रवी व त्याच्या पालकांना त्रास द्यायला सुरुवात केली.  काही दिवसांपूर्वी दारुच्या नशेत ती पतीच्या ऑफिसमध्ये त्याला ऑफिसबाहेर बोलवून मोठा गोंधळ घातला असे पीडित पतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पत्नीने पतीविरोधात घरघुती हिंसाचाराची तक्रार केली होती. पत्नी आपल्याला कोणत्याही खोट्या प्रकरणात अडकवू शकते म्हणून पतीने खोकरा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल करत सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!