CoronaEffectOnLoksabha2020 : कोरोनाचा परिणाम : संसदेचे अधिवेशन वेळेच्या आतच गुंडाळण्याचे संकेत

कोरोनाच्या पार्शवभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन ऑक्टोबरपूर्वीच गुंडाळण्याचा विचार सुरू असल्याचे वृत्त आहे. लोकसभेचे सभापती प्रमुख असलेल्या व्यवसाय सल्लागार समितीची बैठक आज संध्याकाळी झाली. या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. संसद अधिवेशनाच्या कालावधीबाबत सरकार आणि विरोधी पक्षातही चर्चा झाली. बीएसीच्या बैठकीत संसदेचं पावसाळी अधिवेशन लवकरच संपवण्याबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षात एकमत झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. संसद अधिवेशन सुरू झाल्यापासून आतापर्यंत दोन मंत्री आणि भाजपचे एक खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे संसेदचे पावसाळी अधिवेशन नियोजित वेळेपूर्वी संपवण्यावर विचार केला जात आहे. पुढील आठवड्यात बुधवार किंवा गुरुवार पर्यंत संसदेचं पावसाळी अधिवेशन चहलेल असे सांगण्यात येत आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून सुरू झाले असून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत घेण्यात आलं. यानंतर दुपारी ३ ते संध्याकाळी ७ या वेळेत कामकाज झालं. त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते संध्याकाळी ७ या वेळेत राज्यसभेचं कामकाज सुरू झालं. यानंतर, रोज सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत कामकाज घेण्यात आलं. अधिवेशन काळात शनिवार आणि रविवारी सुट्टी रद्द करण्यात आलेली आहे. घोषित केल्यानुसार पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून ते १ ऑक्टोबरपर्यंत घेण्याचं नियोजन आहे. पण करोना संसर्गामुळे हे आधिवेशन आधीच संपण्याची शक्यता आहे. भाजप खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी राज्यसभेत भाषण केलं. नंतर करोना चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळून आले. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी केलेल्या तपासणीत त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता परंतु आत त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सभागृहाची चिंता वाढली आहे . त्याचप्रमाणे नितीन गडकरी आणि प्रह्लाद पटेल यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून संसदेच्या दोन्हीही सभागृहातील अनेक खासदार आणि मंत्र्यांच्याही चाचण्याही सातत्याने घेण्यात येत आहेत.