Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : केंद्र सरकारने देशावर किती लाख कोटींचे कर्ज करून ठेवलंय पहा तर खरं !!

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी , मोदी सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांचे समर्थक देशाची अर्थव्यवस्था चांगली असल्याचा दावा करीत सर्व काही आलबेल आहे असे कितीही सांगत असले तरी देशाची अर्थव्यवस्था किती डबघाईला आली आहे ? याचे उत्तर नुकतेच मिळाले आहे . सार्वजनिक कर्जाशी संबंधित अर्थ मंत्रालयाच्या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे . यातून  केंद्र सरकारवर  जून 2020 च्या अखेरीस 100 लाख कोटींच्यावर कर्ज झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे .  वर्षभरापूर्वी म्हणजेच जून 2019 मध्ये कर्जाचा  आकडा 88.18 लाख कोटी रुपये इतका होता.

याबाबत सार्वजनिक कर्ज व्यवस्थापनाने शुक्रवारी या बद्दलचा मासिक अहवाल प्रसिद्ध केला असून त्यानुसार जून 2020च्या  अखेरीस देशावरील कर्जाचा आकडा 101.3 लाख कोटी  इतका आहे . यातील सार्वजनिक कर्जाचे प्रमाण 91.1 टक्के इतके आहे. बिझनेस स्टॅंडर्ड या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार आजघडीला केंद्र सरकार वरील कर्ज 101.3 लाख कोटी इतके आहे.  मार्च 2020 मध्ये केंद्र सरकार वरील कर्ज 94.6   लाख कोटी रुपये इतके होते काळात कर्जाचा आकडा वेगाने वाढला आहे आता हे कर्ज 100 लाख कोटींच्या वर गेले आहेत.

केंद्र सरकार वरील सर्वात मोठा वाटा बँकांचा 39 टक्के आहे तर विमा कंपन्यांचा क्रमांक दुसरा असून हि टक्केवारी 26.2 टक्के इतकी आहे . चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत केंद्र सरकारने 3 लाख 46 हजार कोटींच्या सिक्युरिटी जाहीर केल्याचे नमूद करण्यात आले असून वर्षभरापूर्वी याच कालावधीत सरकारने 2 लाख 21 हजार कोटींच्या सिक्युरिटीज  जारी केल्या होत्या. दरम्यान कोरोना काळात आरोग्य सुविधांवर प्रचंड प्रमाणात खर्च झाल्यामुळे आर्थिक समस्यांना मध्ये वाढ झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र मागीलवर्षीही कर्जाचे आकडे मोठेच होते. त्यामुळे सरकार कोणतीच माहिती विश्वासाने देत नसल्याचेच स्पष्ट होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!