AurangabadCrimeNewsUpdate : भावी पोलीस तरुणाला मारहाण करून लुटले

औरंगाबाद – रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराने भावी पोलिस तरुणाला काल संध्याकाळी ७.३० च्या सुमारास लाथाबुक्क्याने व बेल्टने मारहाण करंत गळ्यातील अडीच तोळ्याचे लाॅकेट व १५ हजार रु. रोख रक्कम घेत पोबारा केला. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
भागवत बद्रीनाथ ढाकणे(२८) रा. आडगाव बुद्रुक असे मारहाण झालेल्या भावी पोलिसाचे नाव आहे. भागवत ढाकणे हे पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण घेत आहेत.ढाकणे चे मित्र हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत आहेत. शिक्षा भौगणार्या कैद्याचे आई वडिल कोरोना पाॅझिटिव्ह असून त्यांच्याशी कैद्याचे बोलणे करुन देण्यासाठी ढाकणे यांनी हर्सूल पोलिसांकडून कैदी बोलणार असणारे नंबर कैद्याच्या आई वडलांचेच आहेत.याची खातरजमा हर्सूल पोलिसांकडून करुन घेत ते पत्र हर्सूल मध्यवर्ती कारागृहात नेऊन देत असतांना रेकाॅर्डवरचा गुन्हेगार गणेश फुले आणि त्याच्या दोन साथीदारांनी ढाकणे ला बेदम मारहाण करंत जबरी चोरी केली. गणेश फुले वर हर्सूल पोलिस ठाण्यात ३०७, चिकलठाणा पोलिस ठाण्यात ३९५ असे गुन्हे दाखल आहेत.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पांडुरंग भागिले करंत आहेत