UttarPradeshCrimeUpdate : मुलगी अर्ध्या रात्री प्रियकराला भेटण्यासाठी गेल्याने बापाने दोघांवरही घातलेकुऱ्हाडीचे घाव , मुलगी जागीच ठार

घरातून आई वडिलांचा विरोध असतानाही मुलगी प्रियकराला भेटण्यासाठी मध्यरात्री त्याच्या घरी निघून गेल्याचे समजताच मुलीच्या वडिलांनी संतापाच्या भरात दोघांवर कुर्हाडीचे घाव घालून त्यांची निर्घृण हत्या केली. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हि घटना घडली असून ऑनर किलिंगमुळे हि घटना घडल्याचे पोलिसांनी म्हटले आहे . या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर तरूण गंभीर जखमी असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर मुलीचा बाप फरार झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेअसून अधिक तपास चालू आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, तरूण आणि तरुणी शेजारीच राहतात. या दोघांची घरे समोरासमोर आहेत. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. दीड वर्षापासून त्यांच्यात प्रेमसंबंध आहेत. मात्र मुलीच्या कुटुंबीयांचा त्यांच्या या प्रेम प्रकरणाला विरोध होता. असे असतानाही कुटुंबीयांचा विरोध झुगारून सदर तरुणी मध्यरात्री आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला त्याच्या घरी गेली होती. त्यावर तरुणाचे वडील तक्रार घेऊन मुलीच्या घरी गेले. हि माहिती मिळताच तरुणीचा बाप संतापला आणि त्याने मुलगी आणि त्या तरुणावर कुऱ्हाडीचे घाव घातले. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर तरूण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.