Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : उद्वेगजनक : कोरोनाबाधित विवाहितेवर कोविड सेंटरमध्ये बलात्कार , सुरक्षा रक्षक गजाआड

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबईच्या भाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये एका २० वर्षीय तरुणीवर बाऊन्सरने सलग तीन दिवस बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिने ही बाब आपल्या पतीला सांगितल्यानंतर ही घटना उजेडात आली.  स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पीडित तरुणीच्या आईने आरोपी बाऊन्सरविरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात ही घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित बाऊन्सरला अटक केली असून  त्याला १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Advertisements

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार , पीडित तरुणीची  मोठी बहीण प्रसुतीदरम्यान झालेल्या त्रासाने दि. २६ मे रोजी मरण पावली होती. तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील सात जणांना भाईंदरमधील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. पीडित तरुणी आणि तिची भाची कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्या दोघींना  त्याच सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. पीडितेने सांगितले की, २ जून रोजी रात्री दहा वाजता आरोपीने दरवाजा ठोठावला. मुलीला दूध आणि गरम पाणी देण्याच्या बहाण्याने तो आला होता. तो आतमध्ये आल्यानंतर त्याने माझ्यावर बळजबरी केली. त्यानंतर याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर, ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सलग दोन दिवस त्याने माझ्यावर बलात्कार केला, असा आरोपही तिने केला. तरूणी गरोदर राहिल्यानंतर तिने याबाबत पतीला सांगितले. आता तिचा पती घटस्फोट घेण्याचा विचार करत आहे, अशी माहिती पीडितेच्या आईने दिली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!