Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaEffect : राज्यातील अनेक आमदारांसोबत आणखी एका मंत्र्यालाही कोरोनाने गाठले

Spread the love

महाविकास आघाडीच्या  सरकारमधील  नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर सर्व आमदारांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये तनपुरे यांना लागण झाल्याचे आढळून आले आहे. तनपुरे यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. पुरेशी काळजी घेत होतो. मात्र, कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कोरोना काळात आपल्या मतदारसंघात, जिल्ह्यात आणि राज्यातही दौरे करीत होते. त्यांच्या उपस्थिती विविध उपक्रम, बैठका पार पडल्या. मतदारसंघासोबतच नगर शहरातही ते सक्रिय होते. अंतिम वर्ष परीक्षा विषयात त्यांनी सुरुवातीपासून लक्ष घालून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ऐन अधिवेशानाच्या वेळी त्यांना करोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने त्यांना अधिवेशनात भाग घेता आला नाही. त्यांच्या आधी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. सर्वप्रथम गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अस्लम शेख , अब्दुल सत्तार   यांनाही करोनाचा संसर्ग झाला होता. या सर्वांनीच करोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. मंत्र्यांशिवाय अनेक आजी-माजी आमदार, खासदारांनाही करोनाने गाठले होते आणि अजूनही हा संसर्ग चालूच आहे. याशिवाय जवळपास ३५ आमदारांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार चालू आहेत तर कोणी घरात क्वारंटाईन आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!