Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : सीमा वादामध्ये आज घडीला युद्ध झाल्यास भारताचा पराभव होईल, चिनी माध्यमांची दर्पोक्ती

Spread the love

भारतीय जवानांनी आतापर्यंत चिनी सैनिकांच्या घुसखोरीचा प्रत्येक प्रयत्न  उधळून लावला आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षनानंतर निर्माण झालेला तणाव अद्यापही निवळला नसतानाच चीनकडून दुहेरी भूमिका घेतल्याचं दिसत आहे.  एकीकडे चीन शांतता दाखवत आहे तर दुसरीकडे सरकारी प्रसारमाध्यमे युद्धाबाबत बातम्या देऊन भडकावण्याचा प्रयत्न करत आहे. मॉस्कोतील शांघाय सहकार्य परिषदेदरम्यान भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री वे फेंग या नेत्यांमध्ये दोन तास वीस मिनिटे चर्चा झाली. त्यात सिंह यांनी परखडपणे भारताचे सर्व आक्षेप फेंग यांच्यापुढे मांडले. त्यानंतर शनिवारी चीनमधील ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तमानपत्रानं भारताली धमकी दिली. ‘सध्या सुरु असलेल्या सीमा वादामध्ये भारताला जिंकण्याची कोणतीही संधी नाही, आज घडीला युद्ध झाल्यास भारताचा पराभव होईल.’

ग्लोबल टाइम्सने शनिवारी आपल्या संपादकीयमध्ये म्हटलेय की, ‘ चीनच्या ताकदीची भारताला आठवण करुन देतोय. त्यामध्ये सैन्याच्या ताकदीचीही समावेश आहे. भारताच्या तुलनेत चीनची सैन्य ताकद आधिक आहे. भारत आणि चीन दोन्ही महाशक्ती देश आहेत. पण, जर युद्ध झाल्यास भारताचा पराभव होईल. सीमा युद्ध सुरु झाल्यास भारताकडे जिंकण्याची कोणतीही संधी नाही.’ चिनी माध्यमाने शांततेचाही दिखावा केला आहे. दोन्ही देशांच्या सरंक्षणमंत्र्यामध्ये झालेल्या बैठकीत मार्ग निघेल. ही बैठक दोन्ही देशासाठी एक महत्वाची आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिथावणीखोर कृत्ये करू नयेत. नकारात्मक माहिती पसरवून वाद निर्माण न करता दोन्ही देशांनी प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य यावर भर देण्यासाठी एकत्र प्रयत्न करावेत. सध्याची परिस्थिती निवळणे गरजेचे आहे. तसे झाले तरच शांतता प्रस्थापित होऊ शकेल.

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन सीमावादात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवत भारताला पाठींबा दिल्यामुळे चिनी मीडिया भडकली आहे. त्यानं लिहिले आहे की, अमेरिकेची  चीनच्या विरोधात असलेली भूमिका अ्न भारताच्या बाजूने असलेल्या भूमिकेमुळे भारताची ताकद वाढल्याचे  दिल्लीमध्ये बसलेल्या काही लोकांना वाटतं. पण त्यांचाहा अंदाज चुकीचा आहे. चीनच्या शांततेला भारतानं कमजोरी समजली आहे. त्यामुळे सीमा वादात भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पण शांतता कायम ठेवण्यासाठी चीनने ही भूमिका घेतल्याचं विसरता कामा नये. चीन आणि भारत दोन्ही मोठ्या शक्ती आहेत. जे सीमावादात आपली ताकद दाखवू शकतात. पण दोन्ही देशांना शांततेनं हा वाद सोडवणं गरजेचं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!