CoronamaharashtraUpdate : राज्यात १७ हजाराहून अधिक कोरोनाबाधित नवे रुग्ण, २९२ रुग्णांचा मृत्यू

गेल्या २४ तासात राज्यात तब्बल १७ हजार ४३३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून २९२ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोना रुग्णवाढीचा हा आकडा चिंता वाढवणारा असून आज राज्यात उच्चांकी १७ हजार ४३३ नवीन रुग्ण आढळल्याने राज्यातील एकूण रुग्णसंख्या ८ लाख २५ हजार ७३९ इतकी झाली आहे. तर, सध्या राज्यातील विविध रुग्णालयात २ लाख १ हजार ७०३ अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान आज दिवसभरात १३ हजार ९५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजवर एकूण ५ लाख ९८ हजार ४९६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४८ टक्के इतके आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४२ लाख ८४ हजार चाचण्यांपैकी ८ लाख २५ हजार ७३९ चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर बाकीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. राज्यात करोनामृतांचे प्रमाणही वाढतच आहे. आज राज्यात तब्बल २९२ करोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत करोनामृतांचा आकडा २५ हजार १९५ इतका झाला आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर ३.०५ टक्के इतका झाला आहे. राज्यात सध्या १४ लाख ०४ हजार २१३ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर ३६ हजार ७८५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत.