Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : राज्यांना विश्वस्त न घेतल्याने ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केले अनलॉक -४ वर प्रश्नचिन्ह

Spread the love

केंद्र सरकारने अनलॉक -४ संबंधीचे आदेश जारी केल्यांनतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत मोदीसरकारवार पुन्हा एकदा तोफ डागली आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर केंद्र सरकार अनलॉक-४ चा निर्णय  एकट्याने घेऊ शकत नाही, अशा प्रकारचे हे निर्णय राज्य सरकारला लागू करायचे असतात आणि हे पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारला विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या. केवळ मार्गदर्शक सूचना जारी करणे पुरेसे असत नाही. केवळ जिल्हा प्रशासनालाच स्थानिक पातळीवर काय स्थिती आहे याची माहिती असते. हे सर्व राज्यघटनेच्या संघीय प्रणालीवर आधारित आहे आणि सर्वांनांच यामध्ये सहकार्य करायला हवे, असे ममता बॅनर्जी यांचे म्हणणे आहे.

दरम्यान  ममता बॅनर्जी यांनी या पूर्वी बुधवारी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी जीएसटीच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती राज्यांना झालेल्या जीएसटीच्या नुकसानीची भरपाई न देणे हे देशाच्या संघराज्यीय संरचनेला कमजोर करण्यासारखे आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये करोनामुळेच जेईईच्या परीक्षेत ७५ टक्के विद्यार्थ्यांना भाग घेता आलेला नव्हता असेही त्या म्हणाल्या होत्या. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळी ते जीएसटीला विरोध करत होते, असा उल्लेखही ममता बॅनर्जी यांनी आपल्या पत्रात केला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्र सरकारने देशातील राज्यांना जीएसटीची देय रक्कम दिलेली नाही. या मुळे गैर भाजपशासित राज्यांनी केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा मुद्दा या पूर्वी अनेकदा मांडलेला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!