IndiaNewsUpdate : कोरोना टेस्ट वाढवू नका , केंद्राचा दबाव, दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांचा आरोप

कोरोना चाचण्या वाढवण्यात येऊ नयेत यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी आपल्या पत्रात केला आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांना जैन यांनी एक पत्र लिहिले असून दिल्लीमध्ये कोरोना चाचण्या रोखण्याचा आरोप त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयावर केला आहे. ‘काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गृह मंत्रालयाकडून दिल्लीच्या अधिकाऱ्यांवर दिल्लीत चाचणी आणखी वाढवल्या जाऊ नयेत यासाठी दबाव टाकण्यात येत आहे.
दिल्लीत निवडून आलेलं सरकार आहे आणि हे सरकार आपल्या जनतेसाठी निर्णय घेण्यात सक्षम आहे. असं असतानाही दिल्लीत करोना चाचण्या करण्यासाठी अरविंद केजरीवाल सरकारला का रोखलं जातंय? दिल्लीच्या अधिकाऱ्यांवर या पद्धतीनं असंविधानिक आणि बेकायदेशीर दबाव का टाकला जातोय? असे प्रश्न उपस्थित करून त्यांनी पुढे म्हटले आहे कि , म्हाला विनंती करतो की अशा पद्धतीचा दबाव टाकला जाऊ नये. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत असल्याने हे घडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.