IndiaNewsUpdate : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान उपचारासाठी फोर्टिस रुग्णालयात

पिछले कई सालो से हर 3 से 4 महीने पर पापा का रूटीन हेल्थ चेकअप होता आया है।कोरोना महामारी के कारण रूटीन हेल्थ चेकअप नहीं हो पाया था।कल देर शाम हमेशा की तरह रूटीन हेल्थ चेकअप के लिए उनको अस्पताल लेकर आया हूँ।पापा पूरी तरह स्वस्थ है।उनकी सेहत को लेकर आप सब का शुभकामनाओं के लिए आभार।
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) August 24, 2020
केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख रामविलास पासवान यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना त्यांच्यावर गेल्या ५ दिवसापासून फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला असून त्यांचे मूत्रपिंड ही निकामी झाले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांचे सुपुत्र खा . चिराग पासवान यांनी गेल्या काही महिन्यापासून त्यांच्या वडिलांचे रुटीन चेकअप न झाल्यामुळे त्यांना फोर्टिस मध्ये दाखल करण्यात आले असल्याचे ट्विट करीत त्यांची प्रकृती चांगली असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान रविवारी त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असली तरी रुग्णालया कडून त्यांची काळजी घेण्यात येत आहे. पासवान यांना आधीपासूनच हृदयविकाराचा त्रास असून २०१७ मध्ये त्यांच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याच्याआधी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. आधीपासूनच हृदयविकार असल्याने त्यांचे हृदय कमजोर झाले असून त्यांच्यावर कुठलीही शस्त्रक्रिया करणे शक्य नसल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.