IndiaNewsUpdate : निवडणूक आयुक्तपदी राजीवकुमार यांची नियुक्ती

Rajiv Kumar who has been appointed as the Election Commissioner will take charge of office on September 1. https://t.co/IbYOWuRBLe
— ANI (@ANI) August 21, 2020
निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांची आशियाई विकास बँकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने , रिक्त झालेल्या जागेवर माजी अर्थसचिव राजीवकुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. राजीवकुमार हे १ सप्टेंबर रोजी पदाची सूत्रे स्वीकारतील. सुनील अरोरा हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, तर सुशील चंद्रा हे दुसरे निवडणूक आयुक्त आहेत. राजीव कमार हे १९८४ च्या बॅचचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत.
केंद्रीय विधी मंत्रालयाने अधिसूचनेद्वारे राजीवकुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केल्याची माहिती दिली. राजीव कुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नेमणूक झाल्याने राष्ट्रपती आनंदी झाले आहेत. अशोक लवासा यांच्या राजीनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयुक्त म्हणून राजीवकुमार निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होतील, असे विधी मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे. सुनील अरोरा हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. तर सुशीलचंद्र हे दुसरे निवडणूक आयुक्त आहेत. राजीवकुमार हे आता दहा दिवसांनंतर या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकात सहभागी होणार आहेत.
राजीवकुमार यांना सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाचा ३० वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी बीएससी आणि एलएलबीसह पब्लिक पॉलिसी अँड सस्टेनिबिलिटी विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. राजीवकुमार यांना गेल्या वर्षी जुलै महिन्यात वित्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांचा कार्यकाळ यावर्षी फेब्रुवारीमध्ये संपला होता. राजीव कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक समावेशनाच्या योजनांमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे. यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना आणि मुद्रा कर्ज योजना यांसारख्या प्रमुख योजनांचा समावेश आहे.