Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraRainUpdate : राज्यात सर्वत्र पावसाचा हाहाकार , कोल्हापुरातील सर्व धरणे भरली , येत्या २४ तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता

Spread the love

गेल्या दोन दिवसांपासून  राज्यात पावसाने सर्वत्र धुमाकुळ घातला  असून  येत्या २४ तासांत  मराठवाड्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आणखी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आली आहे. नैऋत्य मौसमी वारे सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात सक्रीय आहे. त्यामुळं या भागात पावसाचा मुक्काम लांबला आहे.  कोकण व घाट भागात दाट ढग आल्यानं घाट भागात (सातारा, पुणे) या भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज आहेत. तर, मराठवाड्यात पुर परिस्थितीची शक्यता असल्यातं, हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान  गेल्या दोन दिवसांपासून धुव्वाधार पावसामुळे कोल्हापूर जिल्हा याही वर्षी महापुराच्या विळख्यात सापडण्याची  शक्यता वर्तविण्यात येत असून  जिल्ह्यात सर्वत्र सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे . विशेष म्हणजे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने महापुराचा धोका अधिकच वाढला आहे. हा धोका लक्षात घेऊन राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून शंभरावर बंधारे पाण्याखाली गेली आहेत. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.

कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गाशिवाय  पुणे, सातारा, कोल्हापूर येथील घाट भागांमध्ये गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगडमध्ये बुधवारी पावसाचा जोर किंचित कमी होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथेही मंगळवारी आणि बुधवारी मध्यम स्वरूपाच्या तर गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.

दरम्यान मराठवाड्यतील औरंगाबादसह सर्व जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे . शनिवारी झालेल्या नोंदीनुसार महाबळेश्वर येथे सर्वाधिक २१ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. चिपळूण येथे २०, भीरा येथे १८, दोडामार्ग येथे १६, गगनबावडा येथे १४ तर विदर्भात भामरागड येथे १३ सेंटीमीटर पावसाची २४ तासांमध्ये नोंद झाली आहे. मालवण, पेडणे, वैभववाडी, माथेरान, सावंतवाडी, खेड, लांजा, पोलादपूर, मंडणगड या ठिकाणीही १२ सेंटीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात तर अतिवृष्टी सुरू असल्याने राधानगरीचे चार दरवाजे उघडले आहेत. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून ती आता इशारा पातळी पर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण भरले आहेत. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे 94 बंधारे पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहेत. अनेक रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे सध्या या मार्गावरून वाहतूक सुरू आहे. अति पावसामुळे महापूराची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे नदीकाठावरील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी जावे हे असे आवाहन करण्यात आले आहे

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!