Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

RajasthanCurrentNewsUpdate : मोठी बातमी : मुख्यमंत्रीपदी पुन्हा अशोक गेहलोत, भाजपच्या ऑपरेशन कमळाचा फज्जा….!!

Spread the love

प्रचंड राजकीय उलथापालथीनंतर राजस्थानात अशोक गेहलोत सरकारने विधानसभेत अखेर  विश्वास ठराव जिंकला असल्याने प्रचंड परिश्रम घेऊनही भाजपच्या ‘ऑपरेशन कमळ’ चा फज्जा उडाला. भाजपच्या अनेक खटपटीनंतर विधानसभा अधिवेशन बोलावण्यात भाजप यशस्वी  झाल्यानंतर भाजपकडून सदनात अगोदर सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु  त्यापूर्वीच विद्यमान गेहलोत सरकारकडून विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला गेल्याने  भाजपने सभागृहातील एकूण राजकीय रागरंग लक्षात घेऊन आपल्या अविश्वास दर्शक ठरावाच्या योजनेचा त्याग करण्यात धन्यता मांडली आणि पुन्हा एकदा गहलोत सरकार आपली खर्ची टिकविण्यात यशस्वी झाले.

यावर बोलताना काँग्रेसपासून काही काळ दूर गेलेले काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी विरोधकांच्या अनेक प्रयत्नानंतरही सरकारने मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावात बहुमत सरकारच्या बाजुने असल्याचे सिद्ध झाल्याचे सभागृहात सांगितले. त्यामुळे गहलोत सरकार सध्या तरी तरले आहे . राजस्थान विधानसभा अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर  शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत सदनाचं कामकाज १.०० वाजेपर्यंत स्थगित करण्याचे आदेश सभापतींनी दिले होते. त्यानंतर कामकाज सुरु होताना काँग्रेसकडून गेहलोत सरकारमध्ये कायदे आणि संसदीय कार्य मंत्री शांति कुमार धारीवाल यांनी सदनात विश्वास ठराव सादर केला.

दरम्यान, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सचिन पायलट यांच्या आसन व्यवस्थेत बदल करण्यात आलेला दिसला. आता सचिन पायलट यांचे असं मुख्यमंत्र्यांच्या बाजूला न ठेवता त्यांना आसन क्रमांक १२७ वर बसावे लागले. यावर बोलताना ते म्हणाले कि , ‘मला विरोधी पक्षाजवळ यासाठी बसवण्यात आलंय कारण सीमेवर नेहमी सर्वात शक्तीशाली योद्ध्यालाच पाठवलं जातं. जेव्हापर्यंत मी बसलोय तेव्हापर्यंत सरकार सुरक्षित राहणार आहे. काँग्रेसशी बंडखोरी करणारे आणि पुन्हा पक्षात दाखल होणारे सचिन पायलट आता राज्य सरकारमध्ये मंत्री नाहीत. बंडखोरीची शिक्षा म्हणून पक्षानं कारवाई करत पायलट यांना उप मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजुला केलं होतं. सचिन पायलट आता उपमुख्यमंत्री नसल्यानं त्यांच्या जागेत बदल करण्यात आल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं.  मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या बाजुचे  आसन संसदीय कार्य मंत्री शांति धारीवाल यांना देण्यात आल्याचे चित्र सभागृहात दिसले.

यावर, सदनात आपल्या भाषणाला सुरुवात करताना, ‘आज जेव्ही मी सदनात आलो तेव्हा पाहिलं की मला मागचं आसन दिलं गेलंय. मी शेवटच्या रांगेत बसलोय. मी राजस्थानातून आहे, जे पाकिस्तानच्या सीमारेषेवर आहे आणि सीमेवर नेहमी सगळ्यात मजबूत जवानालाच तैनात केलं जातं. जेव्हापर्यंत मी इथे बसलोय तेव्हापर्यंत सरकार सुरक्षित आहे’, अशा खिलाडू वृत्तीने सचिन पायलट यांनी आपली नवी जागा स्वीकारली. सचिन पायलट यांच्यासोबत राज्य सरकारमधले आणखीन दोन मंत्र्यांनाही पदावरून हटवण्यात आलं होतं. त्यामुळे, विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांच्याही आसन क्रमांकात बदल करण्यात आला. आता १४ व्या नंबरच्या सीटवर विश्वेंद्र सिंह तर पाचव्या रांगेत ५४ क्रमांकाचं आसन रमेश मीणा यांना देण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!