AurangabadNewsUpdate : तांदुळ आणि कापूस बियाणाचे बोगस उत्पादन , आग्राज सीडवर फसवणूकीचा गुन्हा दाखल

औरंगाबाद – तांदुळ आणि कापूस बियाणाचे उत्पादन आणि विक्रीचा परवाना नसतांना आग्राज सीड ने वरील दोन बियाणांचे उत्पादन सुरु केल्यामुळै पंचायत समितीचे बियाने निरीक्षक आणि कृषी अधिकारी राजकुमार मामीडवार यांच्या तक्रारीवरुन सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात कंपनीवरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
ओरिसामधील कटक येथे आग्राज सीड आणि बायोटेक प्रा.लिमिटेड मुख्य कार्यालय आहे. महाराष्ट्रात नित्कृष्ट दर्जाचे बियाणे व परवाना नसलेले बियाणे उत्पादित केल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी पंचायत समितीकडे केल्या होत्या.त्यावरुन पंचायत समितीने चाचणी करंत आग्राज सीड चा अहवाल तयार करुन पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे करंत आहेत