घृणास्पद : लॉकडाऊनच्या काळात मावशीने प्रियकराच्या मदतीने अल्पवयीन भाचीसोबत केले हे दुष्कृत्य , दोघांनाही पोलिसांनी ठोकल्या बेड्या पण…

देशात सर्वत्र कोरोनाचा कहर चालू असताना गुन्ह्याचे प्रमाण मात्र काही केल्या कमी होत नाही. लॉकडाउन काळात आपल्या अल्पवयीन भाचीला तिच्या इच्छेविरोधात अश्लील चित्रफीत दाखवून शोषण करणाऱ्या मावशीला व तिच्या प्रियकराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. एप्रिल महिन्यात हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे. अतिशय निराश भावनेने पीडित मुलीने आपल्या आईला याबद्दल माहिती देताच, आईने कोंढवा पोलीस ठाण्यात आपली बहिण आणि तिच्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुणे पोलिसांनीही या प्रकरणात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन मावशी व तिच्या प्रियकराला जेरबंद केले आहे.
याविषयी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , एप्रिल महिन्यात लॉकडाउन सुरु असताना कामामुळे पीडित मुलीची आई आपल्या ४ मुलांना बहिणीकडे सोडायची. याच दरम्यान मावशीचा प्रियकर तिला भेटण्यासाठी घरी यायचा. मुलीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मावशी व तिचा प्रियकर तिच्या इच्छेविरोधात अश्लील चित्रफीत दाखवत होते. मुलीने इतके महिने याप्रकरणी वाच्यता केली नाही. परंतू अखेरीस या प्रकारामुळे मानसिकदृष्ट्या झालेल्या या मुलीने आपल्या आईला घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिल्या नंतर कोंढवा पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी केली असता दोन्ही आरोपींचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. सदरचा गंभीर गुन्हा असल्यामुळे न्यायालयानेही आरोपींना कोठडीत टाकण्याची परवानगी दिली खरी परंतु कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे जेल प्रशासनाने आरोपींना दाखल करुन घेण्यास नकार दिला . दरम्यान दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून त्यांच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचार झाल्यानंतर पुढील कारवाईबद्दल ठरवलं जाईल असेही या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.