AurangabadCrimeUpdate : कुख्यात जुन्ना जेरबंद, ३ गुन्हे उघडकीस, १ लाख ८९हजारांचा मुद्देमाल जप्त

औरंगाबाद – जिन्सी पोलिसांनी कुख्यात जुनेद शेख पिता आरेफ शैख (२०) रा.संजयनगर गल्ली नं१५ याने७व ८आॅगस्ट रोजी केलेल्या दोन घरफोड्या व एक मोटरसायकल चोरी हे गुन्हे उघडकीस आणून १लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
७आॅगस्ट रोजी अजबनगरातील सागर अरगडे यांची १लाख २५ हजारांची मोटरसायकल मोंढानाका परिसरातून रात्री १०वा. लंपास झाल्याचा गुन्हा जिन्सी पोलिसांकडे दाखल होता. तर ८आॅगस्ट रोजी पहाटे २ते ३ च्या सुमारास संजयनगरातील गल्ली नं १मधे आसाराम चव्हाण या रिक्षाचालकाचे घरफोडून ५०हजार ९०० रु.चा ऐवज लंपास केला व एक तासाने सतीष देवकर या मजुराचे घर फोडून १३हजार ३०० रु.चा एवज लंपास झाल्याचे दोन्ही गुन्हे जिन्सी पोलिसांकडे दाखल झाले होते. खबर्याने पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांना माहिती दिल्यानंतर संशयावरुन जुन्ना ला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने तिन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. व मुद्देमाल काढून दिला. वरील कारवाई पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दत्ता शेळके पोलिस कर्मचारी रफी शेख, संपत राठोड, हेमंत सुपेकर, रामदास खाजेकर यांनी पार पाडली.