SushantSinghRajputDeathCase : मोठी बातमी : सुशांत सिंह राजपूत कथित आत्महत्या प्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे , रिया चक्रवर्तीसह 6 जणांवर गुन्हा…

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत कथित आत्महत्या प्रकरणात आता केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयच्या चौकशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहेत. सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की, बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. केंद्राने बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी सीबीआय करणार आहे. दरम्यान, १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूत याने वांद्रये येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, पोलिसांना आतापर्यंत कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही.
दरम्यान सुप्रीम कोर्टात बुधवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार चौकशीचा अहवा तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात सर्व बाजू आपल्या लेखी उत्तरांत देण्याचे कोर्टानं आदेश दिले आहेत. यानंतर सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देईल. कोण चौकशी करेल आणि कुठले राज्य करणार यावर निर्णय देईल.
सुशांत सिंहचे वडिल केके सिंह यांनी (वय-७४) यांनी २८जुलैला अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंबीय अशा सहा जणांविरुद्ध पाटणा येथील राजीव नगर पोलीसमध्ये एफआयआर नोंदवली आहे. सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका रिया चक्रवर्तीवर ठेवण्यात आला आहे. केके सिंह यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. बिहार पोलीस या प्रकरणी चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले होते. मात्र, बिहार सरकारने केंद्र सरकारकडे या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. रियाने आपलं करिअर घडवण्यासाठीच मे २०१९ सुशांतशी मैत्री केली होती.