PuneCrimeUpdate : एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला करून वाहितेचा खून करणाऱ्या आरोपीचाही उपचारादरम्यान मृत्यू

पिंपरी-चिंचवडमध्ये काल शनिवार एकतर्फी प्रेमप्रकरणातून एका विवाहित तरुणाने एका विवाहित महिलेचा भर रस्त्यात धरदार चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. महिलेवर हल्ला केल्यानंतर आरोपीने स्वतःच्या पोटात देखील चाकूने वार करीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, यामुळे तो गंभीर जखमी झालेला असताना त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर ‘त्या’ गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचा काल रात्री उशीरा उपचारदरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय महिलेवर आरोपी अरविंद गाडे (वय- ३०) याचे एकतर्फी प्रेम होते. यातूनच शनिवारी दुपारच्या सुमारास घरी परतत असताना अरविंदने या महिलेचा रस्ता अडवून बोलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या महिलेने बोलण्यास नकार दिल्याने संतापलेल्या अरविंदने चाकू काढून महिलेच्या पोटात भोसकला होता. यानंतर त्याने स्वतः वर देखील चाकूने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याल रुग्णालयात दाखल करण्यता आले होते. अखेर काल रात्री उशिरा त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, अरविंद शेषेराव गाडे (वय ३०) असं आरोपीचं नाव आहे. त्याच एका २९ वर्षीय विवाहित महिलेवर एकतर्फी प्रेम होतं. दरम्यान, मृत महिलेला तीन मुलं तर आरोपीला दोन मुलं आहेत. दरम्यान, एकतर्फी प्रेम प्रकणामुळे दोन संसार उघड्यावर आले असून, आई आणि वडिलांपासून मुलं पोरकी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अरविंदचं या महिलेवर एकतर्फी प्रेम होतं. तो तिच्याशी वारंवार बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मोबाईलवर फोन करून त्रासही देत होता. हे प्रकरणी काही दिवसांपूर्वी त्या महिलेच्या पतीच्या कानावर गेलं त्यानंतर त्यांनी आरोपी अरविंदला समजावून सांगितलं. मात्र, त्याचं कृत्य पूर्वीप्रमाणेच सुरु असल्याने अखेर संबंधित महिलेनं आपला मोबाईल क्रमांक बदलला. त्यामुळे अरविंद जास्तच संतापला.
दरम्यान,काल दुपारी संबंधित महिला कामावरून घरी येत असताना आरोपीने संधी साधून भर रस्त्यात तिला अडवून बोलण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये वाद झाल्याने अरविंदने सोबत आणलेल्या चाकूने थेट तिला भोसकलं. तसेच त्याच चाकूने त्याने स्वतःवरही वार केले. यात काल महिलेचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी आरोपी अरविंदचा न त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला . या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने करीत आहेत.