Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : व्वा रे पोलीस !! लग्नाचे आमिष दाखवून , शारिरीक संबंधाचे केले व्हिडीओ चित्रीकरण…

Advertisements
Advertisements
Spread the love

महिला तक्रार निवारण केंद्राने हाकलून दिले पण आयुक्तांनी दिला न्याय….

लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध प्रस्थापित करुन मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील शिपायाने २८ वर्षीय तरुणीचे हॉटेलात व्हिडीओ चित्रीकरण केले. तसेच तिचे लग्न मोडण्यासाठी त्याने भावी पतीला शारिरीक संबंधाचे व्हिडीओ पाठवले. त्यामुळे तरुणीचे लग्न मोडले. याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र दाभाडे (३६, रा. सिध्दार्थनगर, टिव्ही सेंटर, हडको) असे अत्याचार केलेल्या शिपायाचे नाव आहे.

Advertisements

हडको भागातील एका २४ वर्षीय तरुणीला पोलिस शिपाई रविंद्र दाभाडे याने लग्नाचे अमिष दाखवत तिच्या इच्छेविरुध्द शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यासाठी २०१५ ते २०२० याकाळात तिला वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी तो घेऊन गेला. तरुणीच्या नकळत शारिरीक संबंधांचे व्हिडीओ तयार केले. त्यानंतर एकेदिवशी तरुणीचा साखरपुडा झाला. त्याचदिवशी सांगत तिला पुन्हा रेल्वे स्टेशनच्या एका हॉटेलात दाभाडेने बोलावून घेतले. तत्पुर्वी तिला व्हिडीओ चित्रीकरण केल्याचे खोटे सांगत पुन्हा शारिरीक संबंध केले. या शारिरीक संबंधाचे व्हिडीओ त्याने तरुणीच्या भावी पतीला पाठवले. त्यामुळे तरुणीचे लग्न मोडले. याप्रकारानंतर तरुणीने पोलिसात तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली नाही. पुढे न्याय मागण्यासाठी ही तरुणी महिला तक्रार निवारण केंद्रातही गेली. पण तेथे सुध्दा तिच्या पदरी निराशाच आली. मग अखेर १ आॅगस्ट तरुणीने पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेत हकीकत मांडली. त्यानंतर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक गीता बागवडे या करत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!