AurangabadCrimeNewsUpdate : प्लॉटच्या वादातून वकीलावर सहा वर्षांनी पुन्हा प्राणघातक हल्ला

औरंंंगाबाद : प्लॉटवर अतिक्रमण करून बांधकाम करण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून सात ते आठ जणांनी वकीलाला मारहाण करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. ही घटना ३० जुलै रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास हर्सूल परिसरातील कोलठाणवाडी रोडवर घडली. अॅड. शेख नासेर अब्दुल वाहेद पटेल (वय ३९, रा.करीमनगर, कोलठाणवाडी रोड, हर्सूल परिसर) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वकीलाचे नाव आहे.२०१४ साली याच आरोपींनी रंगीन दरवाजा जवळ अॅड.शेख नासेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.या प्रकरणी सिटीचौक पोलिस ठाण्यात ३०७कलमान्वये गुन्हा दाखल आहे.अशी माहिती तपासात उघंड झाली
अॅड. शेख नासेर यांच्या आजोबाच्या नावाने हर्सूल गावातील जामा मस्जिदजवळ २० बाय २५ पुâटाचा प्लॉट आहे. सदरील प्लॉटवर शेख युनूस शेख सिवंâदर पटेल यांनी अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर अॅड. शेख नासेर पटेल यांनी शेख युनूस पटेल यांना प्लॉटवर अतिक्रमण करून बांधकाम करण्यास मज्जाव केला होता. त्यावेळी शेख जाकेर शेख सिवंâदर पटेल, शेख युनूस शेख सिवंâदर पटेल, गफार पटेल, शेख सुलतान शेख युनूस पटेल, शेख सद्दाम शेख युनूस पटेल, शेख अराफत फजल पटेल, शेख सरदार शेख युनूस, नदीम नाजी पठाण, सर्व रा.हर्सूल गाव यांनी अॅड. शेख नासेर पटेल यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच त्यांच्या कार क्रमांक (एमएच-०९-बीएक्स-६९१९) च्या काचा फोडल्या होत्या.
याप्रकरणी अॅड. शेख नासेर पटेल यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्राणघातक हल्ला करणा-या आठ जणांविरूध्द हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसउपनिरीक्षक पांडूरंग भागीले करीत आहेत.