AurangabadCrimeUpdate : मास्क बांधून “ते” भर दुपारी आले , विवाहितेचे हात पाय बांधले आणि चोरी करून पसार झाले….

भावसिंगपुरा भागातील निसर्ग कॉलनीतील घटना
विवाहितेला दोरीने बांधून चोरांनी भरदिवसा घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने लांबवले. ही घटना भावसिंगपुरा भागातील निसर्ग कॉलनीत ३० जुलै रोजी दुपारी दोन ते साडेतीनच्या सुमारास घडली.
भावसिंगपुरा भागातील निर्सग कॉलनीमध्ये निवृत्त पोलिस कर्मचा-याची मुलगा व सून राहते. ३० जुलै रोजी दुपारी निता दत्तू आहेरकर (३०, रा. संविधान चौक, निसर्ग कॉलनी) या घरात एकट्याच होत्या. त्यावेळी त्यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीवरुन दोन जण मास्क घालून आत शिरले. त्यानंतर दोघांनी निता यांच्या तोंडाला रुमाल लावून बेशुध्द केले. निता बेशुध्द झाल्यानंतर त्यांचे दोरीने हातपाय बांधून कपाटातील एक तोळ्याचे नेकलेस व सहा हजारांची रोकड लंपास केली. दुपारी साडेतीनच्या सुमारास निता या शुध्दीवर आल्यानंतर घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर घटनेची माहिती त्यांनी पती दत्तू आहेरकर यांना दिली. त्यावरुन दोघांनी छावणी पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान, ३१ जुलै रोजी या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अंबादास मोरे करत आहेत.