AurangabadCrimeUpdate : कोरोना इफेक्ट : कोरोनामुळे दगावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियाची जनजागृती पथकाला मारहाण, सासु- सुनांवर गुन्हा

औरंगाबाद – आंबेडकरनगर परिसरात कोरोनामुळे दगावलेल्या नागरिकाच्या पत्नी आणि आईने कोरोना जनजागृतीपथकावर हल्ला केला.या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात सासु सुनांवर गुन्हा दाखल झाला आहे.
परिचारिका भाग्यश्री गोडबोले(२६) आणि स्वयंसेविका अरुणा वाकोडे असे धक्काबुक्की झालेल्या महिलांची नावे आहेत. वडरगल्ली ग्रीव्हज च्या बाजूच्या परिसरात महापालिकेच्या जनजागृतीपथकातील परिचारिका आणि स्वयंसेविकेला धक्काबुक्की करंत शिवीगाळ करुन हाकलून दिले.
डाॅ.बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ६जुलै पासुन महापालिकेचे पथक कोविड जनजागृतीसाठी आंबेडकरनगरात काम करंत आहेत. १९जुलै रोजी वडरगल्लीतील एक नागरिक कोरोनामुळे दगावल्याने त्यांच्या पत्नीला व आईला भेटण्यासाठी नातेवाईक आले होते. दरम्यान आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास परिचारिका गोडबोले आणि स्वयंसेविका वाकोडे यांनी गर्दी करु नका तपासणी करुन घ्या अशी जनजागृती केली.तितक्यात दगावलेल्या रुग्णाच्या पत्नी आणि आईने वरील दोघींवर हल्ला करंत परिचारिकेला पिटाळून लावले.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको पोलिस करंत आहेत