Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUdate : दुःखद आणि धक्कादायक : कोरोनामुळे दोन जुळ्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू… !!

Advertisements
Advertisements
Spread the love

कोरोनाच्या बाबतीत अद्याप कुठलाही अनुमान लावणे कठीण आहे. कोरोनाबाधितांच्या उपचाराचा दर वाढत असल्याचा दावा सरकार करीत असले तरी , या संकटात खाकी वर्दीतील कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहे. मात्र अनेक जण या महामारीमुळे आपले कर्तव्य बजावताना शहीद होत आहेत. पोलीस दलातील दोन जुळे भाऊ कोरोनाच्या लढ्यात शहीद झाल्याची घटना समोर आली आहे. दिलीप घोडके आणि जयसिंग घोडके अशी पोलीस असलेल्या या जुळ्या भावांची नावं. दिलीप आणि जयसिंग हे दोघेही एकाच दिवशी पोलीस दलात भरती झाले होते. यापैकी दिलीप हे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात, तर जयसिंग हे अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत होते.

Advertisements

दरम्यान दि.  20 जुलै रोजी दिलीप घोडके यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर दि.  28 जुलै रोजी जयसिंग यांचाही कोरोनामुळेच मृत्यू झाला. अवघ्या 8 दिवसांच्या फरकाने या दोघांचाही कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दोघांच्या मृत्यूमुळे अंबरनाथ पोलीस ठाणे आणि हिललाईन पोलीस ठाण्यातील त्यांच्या सहकार्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे. दरम्यान, राज्यभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज 11 हजार 147 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या 1 लाख 48 हजार 150 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे आज 266 जणांना आपले प्राण गमवावे लागले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!