AurangabadCrimeUpdate : सुधारित बातमी : फरार आरोपीला तत्काळ अटक , प्लॉटच्या वादातून , मोठ्या भावाने लहान भावाचा दोन लाखासाठी काढला काटा ….

औरंगाबाद शहरात मोठ्या भावाने लहान भावाच्या छातीत सुरा भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास शहरातील जवाहरनगर भागात घडली आहे. हत्या केल्यानंतर मारेकरी भाऊ पसार झाला आहे. सूर्यप्रताप ठाकूर, वय-53 वर्ष (रा.परितोष विहार, जवाहरनगर) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर वेद प्रकाश ठाकूर, वय-56 (रा.पैठण) असं भावाची हत्या करून फरार झालेल्या आरोपीचं नाव आहे.
या विषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , सूर्य प्रताप आणि वेद प्रकाश हे दोन्ही सख्खे भाऊ आहेत. वेदप्रकाश हा पैठण येथे राहतो तर मृत सूर्यप्रताप हे औरंगाबाद येथील जवाहर नगर या भागात राहत होते. ते एका कंपनीमध्ये लीगल ॲडव्हायझर म्हणून काम करत होते. आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास मोठा भाऊ वेदप्रकाश हा पैठण औरंगाबाद येथे आला. दोघेही भाऊ घरात बसले असताना वेदप्रकाश याने घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांची आवश्यकता असल्याचं सांगत लहान भाऊ सूर्यप्रतापकडे पैशाची मागणी केली. दोन भावांमध्ये हि चर्चा चालू असताना , चहासाठी घरातील दूध संपल्याने सूर्यप्रताप यांच्या पत्नी अशा ठाकूर या दूध आणण्याससाठी तिसऱ्या मजल्यावरील शेजाऱ्यांकडे गेली. दरम्यान सूर्यप्रताप यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर मात्र दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यावेळी राग अनावर झाल्याने वेदप्रकाशने सूर्यप्रतापवर धारदार सुऱ्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात सूर्यप्रताप रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर निपचित पडताच वेदप्रकाशने रक्ताने माखलेले स्वतःचे कपडे काढून घरातील भावाचे कपडे घालून तिथून पसार झाला.
दरम्यान काम करणाऱ्या बाईने आरोपी वेदप्रकाशला पायरीवरून पळताना पाहिले. तिला संशय आल्याने अशा ठाकूर यांना सांगितले. दोघींनी घरात जाऊन पाहिले असता रक्ताच्या थारोळ्यात सूर्यप्रताप जमिनीवर पडलेले होते. त्यांना तातडीने शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. याबाबत जवाहर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी माहिती दिली असून पोलीस मारेकरी भावाचा शोध घेत आहेत.
प्लाॅट च्या वादातून केला खून
जवाहरनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीला पैठणच्या यशवंतनगर परिसरातून अटक करुन आणले. अटकेनंतर पोलिसांना दिलेल्या पहिल्या जबाबात आरोपीने प्लाॅट च्या वादातून हा खून केल्याची कबुली त्याने दिली. जवाहरनगर पोलिस ठाण्यासमोरील पारितोष विहार या अपार्टमेंट मधे आज सकाळी ९.३०वा. ही घटना घडली.
वेदप्रकाश ठाकूर(५८) रा.यशवंतनगर पैठण असे अटक आरोपीचे नाव आहे.तर सूर्यप्रताप ठाकूर(५४) असे मयताचे नाव आहे. सूर्यप्रताप यांचे ४ भूखंड बिडकीन परिसरात आहेत. त्यापैकी दोन आरोपी वेदप्रकाश चे होते असे आरोपीने पोलिसांना सांगितले.आरोपी वेदप्रकाश ला पैठणला घर खरेदी करायचे होते.त्यासाठी त्याने भावाकडे प्लाॅट विकून दे असा तगादा लावला. किंवा सध्या २ लाख रु दे असे म्हणंत होता. पण दोन्ही पैकी काहीच न झाल्यामुळे वेदप्रकाश ने सूर्यप्रताप चा चाकूने भोसकून खून केला. घटना घडल्यानंतर मयताला एम.जी.एम. रुग्णालयात नेले तिथे डाॅक्टरांनी तपासून मयंत घोषीत केले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्रध्दा वायदंडे आणि पोलीस उपनिरीक्षक भारत पाचोळे करंत आहेत.
मयताला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा एक मुलगी असे दोन अपत्य आहेत. ते पुंडलिकनगरातील विजयनगर काॅलनीत राहतात. पाचवर्षापूर्वी मयताने घटस्फोट घेतला व दुसरे लग्न केले. दुसर्या पत्नीपासून मात्र त्याला कुठलेही आपत्य नाही.